चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मधमाशांच्या हल्ल्यात महिला जखमी…

मुडझा येथील राेहयाे कामावरील घटना;महिला रूग्णालयात दाखल

ब्रम्हपुरी- ब्रम्हपुरी तालुक्यातील मुडझा येथे कालपासून राेजगार हमी याेजना (मनरेगा)चे काम सुरू असुन पहिल्याच दिवशी मुडझा येथील वैशाली पुनेश राऊत या महिलेवर मधमशांनी हल्ला केल्याने ही महिला जखमी झाली. या महिलेला तात्काळ रूग्णालयात दाखल केले आहे.
परिसरात कुठलाही राेजगार नसल्यामुळे दाेन पैसे गाठीला पडावे म्हणून मुडझा येथील बहुसंख्य मजुर राेजगार हमी याेजनेच्या कामावर जात आहे. मुडझा येथे गेल्या दाेन दिवसापासून राेजगार हमी याेजनेच्या कामाला सुरवात झाली आहे.कामाच्या पहिल्याच दिवशी मुडझा येथील वैशाली पुनेश राऊत ही महिला काम करीत असताना मधमाशांनी हल्ला चढविला.या हल्ल्यात ही महिला जखमी झाली.घटनेची दखल घेत ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी तात्काळ या महिलेला आरमाेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.सध्या सदर महिलेची प्रकृति ठीक असुन ही महिला आरमाेरी येथील रूग्णालयात उपचार घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.