चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवा ट्रक ने 7 दुचाकी वाहनांना उडविले

गोंडपीपरी – सुरजागड लोहप्रकल्प नागरिकांच्या जिवावर उठला आहे. आज सुरजागड प्रकल्पाच्या हायवाने गोंडपिपरी येथील संदीप बारसमोर आँटो, सायकलस्वार व सात दुचाकींना धडक दिली. यात तिघे गंभीर जखमी झाले आज 6 ऑक्टोम्बरला दुपारी अडीच वाजता हा अपघात घडला. गोंडपिपरी राज्य महा मार्गावरून सुरजागड लोह प्रकल्प कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवाने आँटो, सायकलस्वारासह सहा ते सात दुचाकींना उडविले. अपघातात गोंडपिपरी येथील धनराज झाडे, माया झाडे सोमनपल्ली येथील प्रकाश चुधरी गंभीर जखमी झाले.घटनास्थळी तहसीलदार के डी मेश्राम,ठाणेदार जिवन राजगूरू हे तात्काळ दाखल झाले.जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात स्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.सुरजागड प्रकल्प गोंडपिपरी तालुक्यातील मुख्य मार्गावरील नागरिकांसाठी जिवघेणा ठरला आहे.सुरजागड प्रकल्पाच्या वाहनाने अनेकांना अपंगत्व आले असून अनेकांचे जिव गेले आहेत.  जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावे. सुरजागड प्रकल्पाने सामान्यांना रोजगार मिळेल हि अपेक्षा होती. पण आता हा प्रकल्प गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांचे जिव घेऊ लागला आहे. पंधरा दिवसापुर्वी सुरजाकडे जाणाऱ्या वाहन मुख्य मार्गावरील घरात घुसला होता.या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले होते.यात वाहनचालकाचा मृत्यू झाला. वारंवार होत असलेल्या अपघातामुळे नागरिकांमध्ये कमालीची धास्ती पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.