
कोरपना – कोरपना येथील आदिलाबाद मार्गावरील एका इमारतीत शाखा पोस्ट मास्तरांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि.३० ला सायकाली ७ च्या सुमारास उघडकीस आली.
साहिल साजिद शेख ( २८ ) रा. चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. तो कोरपना तालुक्यातील मांडवा येथील शाखा डाकघरात पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत होता. कोरपना येथील आदिलाबाद मार्गावरील एका धाब्याच्या समोर असलेल्या इमारतीत तो किरायाने राहत होता. याच इमारतीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपणा पोलीस करित आहे.



