चंद्रपूर (पो. वार्ता.) :- कोरोना विषाणू संसर्ग सुरु असतानाच निजामुद्दीन दिल्ली येथुन चंद्रपुर येथे ११ विदेशी नागरीक हे टुरीस्ट व्हिसा घेवुन, २ भारतीय परराज्यातील नागरीकांसह चंद्रपुर येथील छोटी मस्जीदमध्ये आले होते. चंद्रपुर येथे आल्यानंतर नमुद विदेशी नागरीकांनी जिल्हयातील ईतर ठिकाणी प्रवास करुन त्यांनी व्हिसाचे व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्याने त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अपराध क्रं. २५२/२०२० कलम १८८,२६९,२७०, भादंवि सह कलम ७ (क)२) १४ (बि)(सि) विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६, अन्वये दिनांक ०५/०४/२०२० रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या दरम्यान आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाकडुन यासर्व १३ नागरीकांना चंद्रपुर येथील रेंजर कॉलेज व वसंतभवन येथे संस्थानिक विलगीकरण करण्यात आले होते. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यांनतर नमुद ११ विदेशी व २ परराज्यातील भारतीय नागरीकांना त्यांचे विरुध्द दाखल असलेल्या वरील गुन्हयामध्ये आज रोजी चंद्रपुर शहर पोलीसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांचा न्यायालयीन रिमांड मंजुर केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहे.




