देश दुनिया

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ६७१

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ६७१ एवढी झाली आहे. मागील २४ तासात ८९६ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत २०६ जणांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर ५१६ जणांना विविध रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. एएनआयने या संदर्भातले ट्विट केले आहे. भारताकडे करोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरणाèया हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनच्या ३ कोटी २८ लाख गोळ्या आहेत. या गोळ्यांची भारताची सध्याची गरज १ कोटी गोळ्यांची आहे असे केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. काहीवेळापूर्वी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ६ हजारांवर गेली आहे. याचीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. तसेच हायडड्ढोक्सी क्लोरोक्वाईन टॅबेलटची भारताची सध्याची गरज १ कोटी गोळ्या आहे हेदेखील केंद्रीय आरोग्य विभागाचे सह सचिव अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.