चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून 5 दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात येत आहे. ताडोबा व्यवस्थापनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.15 एप्रिल 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रकल्प बंद करण्यात आला होता.4 जूनच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरांच्या विविध लेव्हलनुसार सामाजिक- पर्यटन कार्यक्रम राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रकल्पाच्या विविध 6 प्रवेशद्वारावरून दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली जाणार आहे. ऑनलाईन बुकींग प्रणाली सुरू नाही. त्यामुळे थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकींग करावे लागणार आहे.1 जुलैपासून पावसाळी नियमाप्रमाणे ताडोबा कोअर क्षेत्र 3 महिने बंद असणार आहे.ताडोबातील पर्यटन सुरू करण्यासाठी रिसॉर्ट – हॉटेल व्यावसायिक- जिप्सी ऑपरेटर यांचा व्यवस्थापन आणि सरकार वर मोठा दबाव होता. बफर क्षेत्रातील सफारी सुरू करण्यासाठी मात्र नियमांसह स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत.
योग ही निसर्गाने पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन धावपळीच्या जिवनात मनुष्य आरोग्याकडे दुर्लक्ष करु लागला आहे. मात्र कोरोना संकटाने आपल्या निरोगी शरीराशिवाय कोणतीच संपत्ती मोठी नसल्याची शिकवण दिली आहे. योगामुळे आपले शरीर, मनाला अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती लाभते. योग ही निसर्गाने मनुष्याला पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी असुन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज न चुकता किमान एक तास योगा करण्याची गरज त्यामुळे आपण योग प्रकाराला प्रोत्साहन मिळावे योग करण्यासाठी स्वंतत्र व्यासपीठ असावे या करिता योग भवन निर्मितीसाठी साठी एक करोड रुपये देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. आज मंगळवारी जागतिक योग दिनानिमित्त योग नृत्य परिवार ट्रस्ट यांच्या वतीने तर यंग चांदा ब्रिगेड यांच्या संयोजनाने पोलिस मैदान येथे विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाला रामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, डॉ. गोपाल मुंदडा, आकाश घोडमारे, आशिष झा, ऐकाडे, सुरेश घोडके, प्रशांत कत्तुलवार, शशिकांत मस्के, जितेंद्र ईजगोरवार, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, प्रा. श्याम हेडाऊ, विश्वजित शाहा, अमोल शेंडे, राम जंगम, विलास वनकर, विलास सोमलवार युवती प्रमुख भाग्यश्री हांडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हा प्रदूषित जिल्हा आहे. अशा प्रदूषित आणि उष्ण जिल्ह्यात निरोगी राहण्यासाठी योग आणि योग नृत्य नित्य करणे गरजेचे आहे. शरिराराला ऊर्जा देण्यासाठी व्यस्त जिवणात थोळा वेळ काढून योग करत शरिर स्वस्थ ठेवले पाहिजे. आयोजकांनी योगाचा योग नृत्य हा नविन प्रकार चंद्रपूरात सुरु केल्या बदल यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजकांचेही आभार मानले. योगा हा व्यक्तीला शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक पातळीसारख्या सर्व आयामांवर नियंत्रण ठेवून उच्च पातळीची संवेदनशीलता प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तसेच अभ्यासावर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगाच्या रोजच्या सरावाला शाळा आणि महाविद्यालयानेही प्रोत्साहन दिले पाहिजे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली जीवनशैली संपूर्ण बदल केला आहे मात्र कोरोनामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलो. निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती हे आपल्याला कळले आहे. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्विकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्विकारली नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्रपूरातही योगाचे महत्व नागरिकांना पटावे त्यांना योग साधना करण्याकरिता स्वताचे भवन असावे या भवनातून योगाचा प्रसार प्रचार व्हावा या करिता चंद्रपूरात योग भवनाची निमिती व्हावी या करिता माझे प्रयत्न असणार असुन या भवनासाठी एक करोड रुपये देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या योग नृत्य महोत्सवात योग साधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
चंद्रपूर(का.प्र.) : लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्यिक वीज ग्राहकांना विज बिलविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व ग्राहकांच्या वीज बिलविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाद्वारे आपले वीज बिल समजून घ्या या विषयावर ऑनलाईन वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी चंद्रपूर परी मंडळअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत […]
चंद्रपूर : सिंदेवाहित आणखी एक कोरोनाबाधित १६ वर्षीय युवती आढळून आली. आज बाबूपेठ, बल्लारपुर व सिंदेवाहित प्रत्येकी एक असे आज दिवसभरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या आता १५ वर पोहोचली आहे.