चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

ट्रकच्या धडकेत दोन ठार तर एक जखमी

चिखल परासोदी रस्ताच्या जवळ रेल्वेचे काम सुरू असल्याने घडला अपघात

नागभिड येथील रेल्वे पटरी जवळ चिखल पर सोडी येथील बोकडे परिवारातील भूषण शामराव बोकडे, वय २१, पवन विनोद बोकडे १५ गिरीष सुधाकर बोकडे वय १६ वर्ष हे तिघेही नागभिड येथील रस्ता ओलांडताना गडचिरोली येथे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन ठार तर एक जखमी झाल्याची घटना दुपारी एक वाजता घडली.

नागभिड पोलीस स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे पटरी जवळ रेल्वे चे काम सुरू असून चिखल परासोदी रस्ता ओलांडताना पंचायत समिती व व मुख्य रस्ता दिसत नसल्याने अपघात झाला असे समजते.हे जरी खरे असले तरी बोकडे परिवारात लग्न सायंकाळी असल्याने धावपळ सुरू होती.यातच हा अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून तरुण मुले मृत्यू झाल्याने सर्व बोकडेे कुटुंबावर संकट आले.पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी येऊन ओळख पटविण्याचे काम केले. मृत्यू झाला त्यांना दवाखान्यात दाखल केले तर जखमीला भरती करण्यात आले असून ट्रक ड्रायव्हर सह वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार मेंढे साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस उप निरीक्षक बरसगडे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.