चंद्रपूर (का.प्र.) नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आवाहन करतानाच जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी अतिशय गंभीरतेने प्रशासन प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. रुग्ण वाढल्यास लॉक डाऊनचा कालावधी वाढू शकतो, असे संकेत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज दिले आहेत. घरातील कोणी एका सुदृढमाणसाने या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंसाठी गरज असेल तरच ओळखपत्रासह बाहेर पडावे. अन्यथा कोणीही बाहेर पडून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासन करत आहे.
जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्धव्हाव्यात यासाठी उपाययोजना करताना नागरिकांनी गर्दीही करू नये, हे देखील बघावे लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यांमध्ये आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. विदेशातून आलेल्या २८ लोकांना १४ दिवसांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ९५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम कॉरेन्टाईन पूर्ण केले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. काल पाठवण्यात आलेल्या ९ पैकी ८ नमुने निगेटिव्ह आले. १ नमुन्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.जिल्ह्याच्या सीमा सर्व बाजूंनी बंद करण्यात आल्या आहे.
येणाèया प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच छोट्याशा गावापासून तर चंद्रपूर सारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात आशा वर्कर आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करत आहेत. या कर्मचाèयांना सहकार्य करावे जर कुणी आजारी असेल तर त्याची माहिती कळवावी. कोरोना हा आजार योग्य उपचाराने काही दिवसांच्या कालावधीत देखील संपूर्णतः बरा होऊ शकतो. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही उदाहरणे पुढे आली आहे. त्यामुळे वेळीच औषधोपचार व संपर्कात न येणे हेच यावरचे उपाय असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाèयांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये सॅनीटायझर व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये यासाठी स्थानिक स्तरावरील सर्व कारखाने सुरू करण्याचे सांगितले आहे. प्रत्येक अत्यावश्यक आस्थापनावरील प्रमुख व्यक्तीने आपल्या कर्मचाèयांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे.



