चंद्रपुर

चंद्रपूर तुकूम व मूल तालुक्यात सुशी गावात प्रत्येकी एक बाधित

*आतापर्यंतची बाधित संख्या ९८*
*उपचार घेणारे कोरोना बाधित ४४*
*आतापर्यत ५४ कोरोनातून बरे*
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १ जुलै रोजी २ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ९८ झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये उपचार घेणारे कोरोना बाधित ४४ आहेत. तर आत्तापर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील सुशी गावामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण पुढे आला आहे. नवी दिल्ली वरून परत आलेल्या २८ वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.
तर दुसरा ३० वर्षीय युवक तुकूम परिसरातील असून वाशिम येथून आला आहे. श्वसनाचा आजार जाणवत(आयएलआय ) असल्यामुळे हा युवक रुग्णालयात दाखल झाला होता. दोन्ही बाधिताची प्रकृती स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.