
चंद्रपुर :- दिनांक २० ऑगस्ट रोजी मनिविरसिंग जयपालसिंग दिल्लर, वय ४४ वर्ष, रा. शास्त्रीनगर, चंद्रपुर यांची ह्युंडाई सेंट्रो कंपनीची गाडी क्रमांक एम एच ०४ सी. ए. ४०९२ किमंत १,००,०००/- रूपयाची घरासमोरून चोरी गेली,
त्याच दिवशी फिर्यादी नामे पंकज दिवाकर मिश्रा, वय ३७ वर्ष, रा. ब्ल्यू पॅराडाईज हॉटेल, भवाजी भाई शाळे जवळ, चंद्रपुर मारूती सुझुकी कंपनीची वॅगनार गाडी क्रमांक एम एच १२ डी एस ७८४२ किमत ४,00,000/- रू. ही ब्ल्यु पॅराडाईज हॉटेलचे बाजुचे पार्कींग मध्ये पार्कींग च्या ठिकाणावरून चोरी गेली.
दोन्ही फिर्यादीनी वाहन चोरीची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार अप क्रमांक ८६२, २०२२ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला..दोन्ही गुन्हयांचे गांभीर्य बघता पो.स्टे. रामनगर ठाणेदार पो. नि. राजेश मुळे, गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले व डि.बी. असे गुन्हयांचे घटनास्थळी भेट देवुन, परिसरातील सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक करीत मुन्हयात वापरलेल्या गाडीचा पाठलाग करीत जुनोना रोड, बाबुपेठ येथे पोहचुन जुनोना रोडवरून गुन्हयात वापरलेली टाटा अट्रोस कंपनीची गाडी क्रमांक एम. एच. जी. जे. ०२ डी. एम. ०५५९ ही ताब्यात घेवुन गाडी मालकाचे नाव निष्पन्न करून आरोपी नामे सतनामसिंग प्रतापसिंग बावरी, वय-३२ वर्ष, रा. शेवला, ता. मेहकर, जि. बुलढाना यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयात चोरून नेलेल्या गाड्या हया बुद्धनगर, बाबूपेठ वार्ड येथुन त्याचे नातेवाईकाचे घराशेजारी ठेवलेल्या आहेत असे सांगितले वरून गुन्हयात चोरून नेलेल्या दोन्ही गाड्या जप्त केल्या.
आरोपी सतनामसिंग प्रतापसिंग बावरी, वय-३२ वर्ष, रा. शेदला, ता. मेहकर, जि. बुलढाना यास विश्वासात घेवुन विचारपुस केले असता त्यानी फरार आरोपी लखनसिंग त्रिपालसिंग सरदार, रा. पोसकोर दरवाजा वडनगर, ता. वडगनगर जि. मैसाना राज्य गुजरात हा गुजरात येथे दारूची तस्करी करण्याकरीता गाडी चोरून नेत असल्याची माहीती दिली. नमुद दोन्ही आरोपीतांवर महाराष्ट्रातील इतर जिल्हयात तसेच गुजरात राज्यात चोरी, घरफोडी तसेच अवैधरित्या दारू विक्रीचे गुन्हे नोंद आहेत. फरार आरोपी लखनसिंग त्रिपालसिंग सरदार, रा. घोसकोर दरवाजा वडनगर, ता. बडगनगर जि. साना राज्य गुजरात याचा शोध घेणे सुरू आहे
दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यास पोलीस स्टेशन रामनगर येथील गुन्हे शोध पत्रकातील सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले तसेच गुन्हे शोध पथकातील सर्व कर्मचारी अतीशय परिश्रम घेवुन दोन्ही गुन्हे हे अवघ्या १२ तासात उघडकीस आणुन आरोपी व चोरीस गेलेल्या गाड्या जप्त केल्या आहेत.
ह्युंडाई सेंट्रो कंपनीची गाडी क्रमांक एम एच ०४ सी. ए. ४०९२ किमंत १,००,०००/- रूपये, मारुती सुझुकी कंपनीची वैगन आर, गाडी क्रमांक एम एच १२ डी एस ७८४२ किमंत ४,००,०००/-रूपये व गुन्हयात वापरलेली टाटा अट्रोस कंपनीची गाडी क्रमांक एम. एच. जी. जे. ०२. डी. एम. ०५५९ किमंत ७,५०,०००/- रूपये असे एकुण १२,५०,०००/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



