
चंद्रपूर : शसकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महत्वाच्या तपासणीचे उपकरणे बंद असणे ही गंभीर बाब आहे. याकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर हे योग्य नाही. ईसीजी मशीनरीची कमतरता लक्षात घेता 6 मशिन आमदार निधीतुन आपण उपलब्ध करुन देऊ, हे रुग्णालय चंद्रपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील नागरिकांच्या उपचाराचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे येथील व्यवस्था सुसज्ज असलीच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत येथील बंद असलेली महत्वाची उपकरणे तात्काळ कार्यन्वित करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्याल प्रशासनाला केल्या आहेत.




