![]()
चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांचा पुढाकार
चंद्रपूर : भारतीय आलिम्पिक विजेत्या कुस्तीपटुंनी मागील १५ दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तथा भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कडक कार्यवाही करावी, या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील बागला चौक परिसरात कॅण्डल मार्च काढण्यात आला.
केंद्रातील मोदी सरकार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कुस्तीपटूंचे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिस बळाचा वापर करीत आहे. त्यामुळे केंद्रातील हुकूमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डीसुजा मॅडम, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनात, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामुभाऊ तिवारी यांचे प्रमुख उपस्थितीत कॅण्डल मार्च काढण्यात आला.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी, कुस्तीपटुवर अत्याचार करणाऱ्या भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली. सुनीता लोढिया, अनुताई दहेगावकर यांनीही तीव्र शब्दात केंद्र सरकारचा समाचार घेतला. आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामुभाऊ तिवारी, शहर महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, महिला काँग्रेस पदाधिकारी अनुताई दहेगावकर, माजी नगरसेविका सकिना अन्सारी, काजी मॅडम, ओबीसी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस (ओबीसी) प्राचार्य नरेंद्र बोबडे, अल्प संख्यांक विभागाचे बापू अन्सारी, मतीनजी कुरेशी, माजी नगरसेवक दुर्गेशजी कोडाम, अनुसूचित जाती विभागाचे कुणाल रामटेके, युवक काँग्रेसचे सचिन कत्त्याल, पप्पू सिद्धीकी, नौशाद शेख, संदीप सिडाम, मोनु रामटेके, विवेक पोतनूरवार, अमोल पालेकर, तोंडंफोडे सर, अरविंद काळे, पगाडे सर, चिडे सर, शिल्पा आंबटकर, उषा तंगडपल्लीवार, संतोषी कन्नूर, कला गाजूला, कविता बावने, सविता पगाडे, चंदा कन्नमवार, रजनी सातपुते, शीतल गीन्नलवार, शालिनी काळे, संगीता टवलारकर, वैशाली सोरते, शेळकी ताई, संध्या धकाते, स्नेहल अंबागडे, वैशाली ऐसेकर, अंजु वैरागडे, अपर्णा धकाते, लीला बुटले, शुभांगी भोयर, सोनाली उईके, वर्षा साखरकर, वंदना खेडकर, सुवर्णा भारस्कर, रेखा भारस्कर, पूजा कारलेवार, रजनी मोगरे, सरिता लवेंगेवार, तेजु पोडे, रंजना जाधव, नम्रता मोरे, मीना उमाटे, रेणुका तुरविलें यांच्यासह अनेक महिला काँग्रेस कार्यकर्त्यां व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.




