चंद्रपुर

आरोग्य सुविधांसाठी आ.मुनगंटीवार यांनी दिला १ कोटी रू.आमदार निधी

चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार त्यांच्या आमदार निधीतुन एक कोटी रुपयांचा निधी चंद्रपूर जिल्हयासाठी प्रदान केला आहे. त्याच प्रमाणे आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या विनंतीनुसार राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी सुध्दा चंद्रपूर जिल्हयासाठी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना प्रदान केला आहे. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी प्रामुख्याने आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व आमदार व खासदारांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतुन निधी उपलब्ध करण्याचे आवाहन केले आहे.

सदर आवाहनानुसार आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्या आमदार निधीतुन १ कोटी रु. निधी जिल्हा प्रशासनाला प्रदान केला असुन खा. डॉ. विकास महात्मे यांना सुध्दा त्यांनी चंद्रपूर जिल्हयासाठी निधी उपलपब्ध करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार खा. महात्मे यांनी २५ लक्ष रु. निधी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला प्रदान केला आहे. अन्य राज्यसभा सदस्य व विधान परिष्द सदस्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतुन निधी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन आपण करणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.