चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आजचे कोरोना अपडेट

रविवारी एकही मृत्यु नाही21 कोरोनामुक्त 4 पॉझिटिव्ह,

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 179

चंद्रपूर,दि.4 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 21 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2 , चंद्रपूर तालुका 0बल्लारपूर 0भद्रावती 1ब्रम्हपुरी 0नागभीड 0सिंदेवाही 0मूल 0सावली 0पोंभूर्णा 1गोंडपिपरी 0राजूरा 0चिमूर 0वरोरा 0कोरपना 0जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 734 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 23 झाली आहे. सध्या 179  बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत 5 लाख 67 हजार 751 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 80 हजार 468 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1532 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

 प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *