गडचिरोली

*सीआरपीएफ मधील ११ जवानांसह इतर ३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह*

                                                                               *रात्री ११ तर दुपारी ३ अहवाल पॉझिटीव्ह, एकुण जिल्हयात सक्रिय बाधित ७४*
*गडचिरोली*: गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन ११३ मधील ९, अहेरी सीआरपीएफ मधील २, अहेरी येथीलच विलगीकरणात असलेला इतर एक आणि गडचिरोली मधील इतर दोन अशा १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ७४ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १३८ झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकुण सर्व ८३ रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये ९ जिल्ह्याबाहेरील आहेत.
अहेरी येथील इतर नागरिकांमधील एकजण विलगीकरण कक्षात होता. त्याचे वय ३२ वर्षे असून नांदेडहून नोकरीत रुजू होण्यासाठी आलेला आहे. तसेच गडचिरोली येथील इतर २ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गुजरात इथून परतलेली ६५ वर्षीय महिला व मुंबईहून परतलेला २७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दोघांनाही गडचिरोली येथे समाज कल्याणच्या होस्टेलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.