चंद्रपूर (का.प्र.)स्थानीय संकल्प संस्थेच्या वतीने २९ मार्च रोजी दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत कोरोनाने उद्भवलेल्या कठीण काळात हातावर पोट असणाèया या गोरगरिबांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न पाहता त्यांना सामाजिक दायित्वातून फूड पॅकेटचे वितरण करण्यात आले. संकल्प संस्था ही संकल्पना येथील नामवंत डॉ. अशोक वासलवार यांची असून त्यांनी गरीब व कुपोषितांना मदत करण्याचे कार्यक्रम घेत असतात. त्याच अनुषंगाने भिकारी व कुपोषितांची भूक भागविण्याच्या उदात्त हेतुने हा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाचे संकट जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत चंद्रपुरातील भिकारी व कुपोषितांना अशा प्रकारचे फूड पॅकेट संकल्प संस्थेच्या वतीने वाटप करण्यात येईल असा संकल्प डॉ. अशोक वासलवार यांनी व्यक्त केला.



