

राजुरा :– केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा राज्यात शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचत आहे,सरकारच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी योजनेच्या माध्यमातून सर्व समाजच्या घटकाचा नागरिकांना लाभ मिळत आहे त्यांचं अनुषंगाने राजुरा तालुक्यातील साखरवाही येथे शासनाच्या माध्यमातून सिमेंट रस्त्याच्या बांधकाम करण्याकरिता जनसुविधा निधी अंतर्गत 10 लक्ष रुपयांचे रस्त्याचे बांधकाम,साखरवाही येथे समशान भूमीचे बांधकाम व जिल्हा परिषद शाळेचे वर्ग खोलीचे लोकार्पण माजी आमदार अँड संजय धोटे यांचे हस्ते संपन्न झाले
कार्यक्रमा प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,ग्रामपंचायत साखरवाहीच्या वतीने माजी आमदार अँड संजय धोटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावातील रस्ते,नाली,पिण्याचे पाणी व ईतर विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देण्यास प्रयत्न करणार असून त्या करिता पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले
यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांचे सह गावच्या सरपंच सौ वर्षा दौलत बोरकुटे,उपसरपंच भास्कर वनकर, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा नळे,अम्रपाली वानखेडे, बाळू टेकाम,शाळेचे मुख्याध्यापक रवि सोयाम,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सपना मडावी,भाजपाचे युवा नेते संदीप गायकवाड,भाजपाचे दौलत बोरकुटे,भोपळे साहेब,तंटा मुक्ती अध्यक्ष गजानन विधाते,जनार्धन बोरकुटे, पुंजाराम बरडे,बाबुराव वाघमारे,ईश्वर वानखेडे,विठोबा वानखेडे,तातोराव आगलावे,यादवराव रासेकर, दिनकर रासेकर,राजेंद्र लोहे,संतोष रासेकर,अरुण पाहनपटे यांचेसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



