
चंद्रपुर :- शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने शहरातील गांधी चौकात रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली. ज्या मातोश्रीने राज्यभरातील शिवसैनिकांना आधार दिला. त्याच मातोश्री बद्दल बंडखोर रामदास कदम यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. त्याचा निषेध करीत असून येत्या काळात शिवसेना स्टाईलने रामदास कदम यांचा समाचार घेतला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे, माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.




