

*हेरिटेज वॉक मार्ग सुरळीत व्हावा म्हणुन स्वच्छता श्रमदान*
*27 नोव्हे पासून सुरुवात, यानंतर प्रत्येक रविवारला ‘हेरिटेज वॉक’*
*स्वच्छ भारत अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव अंर्तगत अभियान*
चंद्रपूरः चंद्रपूर शहरातील गोंड़कालीन ऐतिहासिक वारसा नागरिकांना, विद्यार्थ्यांना बघता यावे, इतिहास जाणुन घेता यावे यासाठी इको-प्रो च्या किल्ला स्वच्छतेसोबत सुरू करण्यात आलेल्या ‘हेरीटेज वॉक’ च्या किल्ला मार्गाची स्वच्छता व मार्ग सुरळीत व्हावा म्हणुन अभियान राबविण्यात येत आहे. यंदा ही किल्ला स्वच्छता “निसर्गासोबत युवा” या विशेष शिबिर अभियान मधे सहभागी समाजकार्य महाविद्यालय चे विद्यार्थी करीत आहेत. “स्वच्छ भारत अभियान” अंर्तगत मागील पाच वर्षापासुन इको-प्रोच्या चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सोबतच मागील तीन वर्षापासुन किल्ला पर्यटनाची सुरूवात करण्यात आलेली आहे. या ‘किल्ला पर्यटन हेरीटेज वॉक’ मधुन स्वच्छ करण्यात आलेल्या किल्ल्याच्या भिंतिवरुन रामाळा तलाव लगतच्या बगड खिडकीच्या बाजुचे बुरूज क्रमांक 4 ते अंचेलश्वर मंदीर गोंडराजे समाधिस्थळ बुरूज 10 पर्यत हा हेरीटेज वॉक असतो. या किल्ल्याच्या वरून जो पादचारी मार्ग आहे, जसे ग्रेट चाईना वॉल किंवा भारतातील ग्रेट वॉल असलेली ‘कुंभलगड’ किल्ला प्रमाणे या पदभ्रमण मार्गावरून पर्यटकांना गोंडकालिन इतिहास व वास्तुची माहीती इको-प्रो संस्थेच्या पर्यटक मार्गदर्शक असेलेले गाईड कडुन देत हा हेरीटेज वॉक पुर्ण केला जातो. स्थानिक तसेच बाहेरून येणाÚया पर्यटकांना ही मोठी पर्वणी असते. खंडहर प्राप्त झालेल्या या किल्ला परकोटाच्या स्वच्छतेनंतर एका भागातुन ही पर्यटनाची सोय इको-प्रो ने करून दिली आहे. प्रत्येक रविवारला होणाÚया हेरीटेज वॉक मध्ये सहभागी होण्याचे आवाहन इको-प्रो तर्फे करण्यात आले आहे. या हेरीटेज वॉकच्या मार्गात मोसमाच्या सुरूवातीस संस्थेचे सदस्य पावसाळयात वाढलेली झाडी-झुडपे काढुन स्वच्छ करीत असतात. तसेच या मार्गात बगड खिडकी जवळ, बुरूज 7 मसन खिडकी जवळ तसेच रामटेके वाडीत तुटलेल्या किल्लाच्या भिंतीच्या भागातुन पर्यटकांना व्यवस्थित जाता यावे, पर्यटन सुरळीत व्हावे म्हणुन बरेच प्रयत्न करावे लागतात, दगडांची रास रचुन मार्ग सुरळीत केला जातो. कचरा, अडगळ काढुन टाकण्यात येते, यामार्गातील किल्ल्याच्या भिंतीची तसेच तुटलेल्या बुरूजाची पुरातत्व विभागाकडुन पुर्णबांधकाम आवश्यक आहे, तेव्हाच सदर पर्यटन मार्ग पर्यटकांकरिता व्यवस्थित होईल. मात्र पर्यटन करता यावे एवढे तात्पुरते डागडुजी कार्य अंतिम टप्प्यात आहे. “इको-प्रो संस्था आपल्या पातळीवर एकीकडे स्वच्छता अभियान राबवित आहे तर, दुसरीकडे स्थानिक पर्यटन विकासाला हातभार लागावा म्हणुन प्रयत्नशिल आहे, आपला ऐतिहासिक वारसा जपला जावा, व्यापक जनजागृती व्हावी म्हणुन कार्य केले जात आहे. मात्र या मार्गात असलेल्या किल्ल्याच्या छोटी-छोटी डागडुजी, पुर्णबांधकामाची कामे मागील चार वर्षात अदयापही पुर्ण केले गेले नाही, हि शोकातिंका आहे. तरी यंदा सुरु होणाऱ्या किल्ला पर्यटन करिता इको-प्रो सज्ज आहे, वरिष्ठ अधिकारी मान्यवर पाहुणे यांच्या उपस्थितीत यंदाच्या मोसमाच्या किल्ला पर्यटनाची सुरुवात रविवार, 27 नोव्हे पासून करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रत्येक रविवार ला सहभागी व्हावे.”


