चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मणिपूर अत्याचाराच्या घटनेचा राजुरा येथे तीव्र निषेध

 मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात राजुरा येथील नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवित मोर्चाद्वारे तहसील कार्यालयाला धडक दिली. यावेळी जोरदार घोषणा देऊन मणिपूर येथील महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यावी, मणिपूर सरकार बरखास्त करा, केंद्र सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान चौकातून मोर्चा निघून तहसील कार्यालयावर गेला. तेथे तहसीलदार यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.
                 या आंदोलनाचे नेतृत्व भूषण फुसे, आनंद अंगलवार, संतोष कुळमेथे, दीपक मडावी, दत्तात्रय मोरे, वामन साळवे, धीरज मेश्राम, गणपत चव्हाण, विजय मोरे, दिनेश पारखी, अ‍ॅड. मारोती कुरवटकर, बापुराव मडावी, मिलिंद गड्डमवार, घनश्याम मेश्राम, मधुकर मटाले, अमोल राऊत, आसिफ सय्यद, मेश्राम, राकेश चिलकुलवार, महिपाल मडावी, अमृत आत्राम, राधा आत्राम, रेश्मा चव्हाण, रेखा टोकलवार, सुजाता नळे, धनश्री कुळमेथे, मंजुषा बोटरे, सुचिता तलसे, वैशाली तलसे, मीनाक्षी मून, अनुसूर्या नुस्थी, सुभाष हजारे, सचिन मोरे, लक्ष्मण तुराणकर, मधुकर डांगे, नीळकंठ साळवे, दिलीप गिरसावळे यांनी केले.
         या निषेध मोर्चात वंचित बहुजन आघाडी, भारत राष्ट्र समिती, बिरसा क्रांती दल, अफ्रोट, मराठा सेवा संघ,  गोंडवाना गणतंत्र पार्टी, छावा फाऊंडेशन, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, आदिवासी विकास परिषद या पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *