चंद्रपुर

*ब्रम्हपुरी तालुक्यातून ८ बाधित*

*चंद्रपूर जिल्हयातील आतापर्यंतची बाधित संख्या ११०*
*उपचार घेणारे कोरोना बाधित ५४*
*आतापर्यत ५६ कोरोनातून बरे                                                                                  * गुरुवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ झाली होती. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी भर पडली असून ब्रह्मपुरी तालुक्यातून एकूण ८ पॉझिटिव्ह रुग्ण पुढे आले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११० झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५४ आहे तर आतापर्यंत कोरोना आजारामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५६ आहे.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी शहरातील दोन रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. भवानी वार्ड येथील २७ वर्षीय पुरुष व २३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
अन्य दोन रुग्ण गांगलवाडीचे असून यामध्ये ४९ वर्षीय पुरुष व ३७ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील ३० वर्षीय पुरुष व २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तालुक्यातील निलज या गावातून देखील तीन वर्षीय बालिका पॉझिटिव्ह ठरली आहे.तर चौगान येथील ३२ वर्षीय पुरुषाचा यामध्ये समावेश आहे.
आजच्या ८ बाधितांपैकी २ बाधित हे अनुक्रमे मुंबई आणि हैद्राबाद येथून आले आहे. तर अन्य ६ बाधित जोखमीच्या संपर्कातील आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *