चंद्रपुर जिल्हा

गळफास घेऊन आत्महत्या

गडचांदूर(ता.प्र.) प्रभाग 2 मध्ये चिवाने लेआऊट मध्ये राहणारा रामेश्वर वेंकटी केंद्रे,(40)याने राहते घरी आज पहाटे 4 वाजता नायलॉन दोरी ने गळफास लावून आत्महत्या केल्या ची घटना घडली,मृतक ची पत्नी नातेवाईकांची तब्येत बिघडल्याने रात्री 11 वाजता चंद्रपूर येथे गेली होती आज पहाटे 5 वाजता घरी परत आल्यावर पती ने गळफास घेऊन मृत पावला चे पाहून रडू लागली, परिसरातील नागरिक गोळा झाले,मृतक चा भाऊ सिद्धेश्वर केंद्रे याला माहिती मिळताच घरी पोहचला,पोलीस स्टेशन ला माहिती दिली,पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, पंचनामा करून प्रेत पोस्ट मारटंम करीता ग्रामीण रुग्णालयात पाठीवले,आत्महत्या मागचे नेमके कारण कळू शकले नाहीत, पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर रामटेके तपास करीत आहेत,,माझ्या भावाची आत्महत्या नसून कटकारस्थान रचून हत्या केली आहेत, या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून सर्व दोषींना अटक करून कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. ,,,
,,,

Leave a Reply

Your email address will not be published.