चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

पोलिस जवानाने सहकाऱ्यावर केला गोळीबार ; सहकारी गंभीर जखमी

 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या शीघ्र कृती दलाच्या पथकातील एका पोलिस जवानाने आपल्याच सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ माजली आहे यामुळं पोलिस दलाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना एटापल्ली पासून जवळचं असलेल्या आलदंडी मार्गावर घडली. 

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या याविषयीच्या अधिक माहितीनुसार एटापल्ली उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या शीघ्र कृती दलाच्या पथकातील संतोष सिडाम या पोलिस जवानाने आपलाच सहकारी असलेल्या विजय करमे या पोलिस जवानांवर आज सकाळच्या सुमारास गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गस्तीवर असतांना संतोष व विजय मध्ये वाद झाला व याचे पर्यवसान गोळीबारात झाले या घटनेत विजय करमे गंभीर जखमी झाले असून त्याला तात्काळ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नागपुरात उपचारासाठी नेण्यात आले. नागपुरात उपचार सुरु असून सद्यस्थितीत त्या जवानांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एटापल्ली पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.