चंद्रपुर

त्या पॉझिटिव्ह रूग्णाचा चंद्रपूरशी संबंध नाही -डॉ.कुणार खेमणार

चंद्रपूर (का.प्र.)जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशात ही कोरोना ग्रस्तांची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात महाराष्ट्र राज्य सर्वाधिक रूग्ण संख्या असलेले राज्य आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकही पॉझिटीव्ह रूग्ण नाही. त्याच प्रमाणे संशयीत रूग्ण संख्या, क्वारेंटाईन मध्ये असलेल्या रूग्णांचे आलेले अहवाल सर्व निगेटिव्ह आलेले आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना, आरोग्य प्रशासन तसेच जनतेचे सहकार्य यामुळे जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या स्थितीत आहे. काल एक चंद्रपूरचा निवासी असलेला व्यक्ती कोरेना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चंद्रपुरात तसेच प्रशासनात खळबळ उडाली होती. मात्र तो रूग्ण चंद्रपुरातील निवासी असला तरी तो विदेशातून आल्यापासून नागपूरला इंन्स्टिट्युशनल क्वारेंटाईन मध्ये होता. तो चंद्रपूर मध्ये आलाच नाही व त्याचा सध्या चंद्रपूरशी संबंध नाही. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना निरीक्षणात घेतल्याचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.