चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

तालुका कृषी अधिकारी ढवळे यांना निरोप

सावली ( राज्य रिपोर्टर ) :  तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांची पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका कृषी अधिकारी म्हणून नुकतीच विनंती नुसार बदली करण्यात आली.तालुका कूषी कायॉलय सावली येथील अधिकारी व कमँचारी यांनी श्री.ढवळे यांना निरोप देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

         श्री. ढवळे हे मागील दाेन वर्षांपासून सावली तालुक्यात तालुका कृषि अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रभावी प्रशासन कौशल्य दाखवून कृषी विभागाच्या विविध योजना यशस्वीपणे रबविल्या, सोबतच परिसरातील शेतकऱ्यांना अविरत निस्वार्थ सेवा दिली आहे.  सौंदार्यपूर्ण वागणूकीतून तालुक्यात  विभागाची व स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली.

         सावली तालुक कृषी अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी यांचे वतीने त्यांना भेट वस्तू व नुकतेच निवृत्त झालेले सहाय्यक अधीक्षक दहेलकर यांना शाल श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला.

      या  प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी अण्णाराव वाघमारे, कृषी पर्यवेक्षक दिनेश पानसे, भाऊराव नांदवार, सर्व कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *