चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यातील संरक्षीत स्मारकांची दुरुस्ती करा – खा. बाळू धानोरकर

केंद्रीय पर्यंटन मंत्री व पुरातत्व विभाग नागपूर यांचेकडे मागणी

चंद्रपूर- पुरातत्व विभागातर्फे जुन्या काळातील राजघराण्यांची स्मारके, समाधी, प्राचीन वास्तू, मंदीरे यांची देखभाल होत असते. मात्र नैसर्गीक माऱ्यांमुळे अनेक ठिकाणी या प्राचीन वास्तू ढासळलेेल्या आढळतात.
चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी या प्राचीन वास्तू असून पर्यटकांच्या आकर्षण बिंदू आहेत. अनेक इतिहास प्रेमी व पर्यटक या वास्तूंचे जतन अधिक जागरुकतेने व्हावे म्हणून मागणी करतात. चंद्रपूर येथे रामाळा तलाव, जटपूरा, पठाणपूरा,  अंचलेश्वर व बिनबा ही चार महाद्वार, चारही बाजूला संरक्षण भिंत (परकोट) तसेच बगड खिडकी, हनुमान खिडकी, विठ्ठल खिडकी, चोर खिडकी, मसान खिडकी आहेत. अंचलेश्वर मंदीर, महाकाली मंदीर, कोहीनूर तलाव, दगडी विहिरी, मुर्त्या आहेत. चंद्रपूरातील किल्याच्या बुरुजांची दुरुस्ती देखील आवश्यक आहे.
वणी येथील जुगाद मंदिर, भद्रावती येथील भद्रनाग मंदिर, विजासन टेकडी, गवराळा गणेश मंदिर, भवानी माता मंदिर, महीशासुर मर्दीनी मंदिर, चंडीका मंदिर, भटाळा वरोरा येथील शिवमंदिर आदी प्राचीन वास्तू आहेत. बल्लारशाह येथे राजा बल्लाळशाह यांचा किल्ला पर्यंटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
या सर्व स्मारकांची देखभाल दुरुस्ती नीट व्हावी म्हणून या सर्व प्राचीन वास्तूंचे दुरुस्तीचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवावे याबाबत देखील मंत्री महोदयांना व श्री. अरुण मल्लीक सुपरीटेंन्डींग ऑर्कालॉजीस्ट यांना खा. बाळू धानोरकर यांनी पत्र दिले असून याबाबतही आज दिल्ली येथून पर्यटन मंत्रालयाचे अधिकारी श्री. आशुतोष सलील यांनी श्री. मल्लीक यांना हे प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्याच्या सूचना दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *