चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

रेल्वे संबंधी मागण्या त्वरीत मार्गी लावाव्या- खा. बाळू धानोरकर

चंद्रपूर, भांदक, वरोरा, माजरी स्थानकांवर थांब्यासह अनेक महत्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक चर्चा

चंद्रपूर: चंद्रपूर, भांदक, वरोरा व माजरी या स्थानकांवर रेल्वे प्रवाश्यांच्या सोयी साठी अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्याच्या मागणी सह अन्य अनेक महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन खा. बाळू धानोरकर यांनी अनिलकुमार लाहोटी, चेयरमन रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांना दिले. या भेटीत अनेक महत्वपूर्ण समस्या व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

      दक्षिण-मध्य, मध्य व दक्षिण-पूर्व-मध्य या रेल्वे झोनला जोडून असलेल्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जुन्या चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाच्या 60 एकर रिक्त जागेत चंद्रपूर रेल्वे जंक्शन ची निर्मिती करणे, बल्लारपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स ट्रेन नं- 01127/01128 ला सी.एस.टी. पर्यंत वाढवून दररोज चालविणे, काझीपेठ-पुणे एक्सप्रेस ट्रेन नं. 22151/22152 आठवड्यातून तीन वेळा चालविणे, सिकंदराबाद ते कागजनगर चालणारी भाग्यनगरी ट्रेन नं- 17233 ला बल्लारपूर पर्यंत आणण्यास रेल्वे मंत्र्यांनी होकार दिला असून याची त्वरित अंमलबजावणी करणे, डेमू ट्रेन नं. 01316 बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून सायं. ६.०० वा. सोडणे, राजुरा-आसिफाबाद रोड वरील अंडरपास करणे, चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पांडेचेरी/नई दिल्ली ट्रेन नं. 22403/04त्रिचापल्ली/भगतकी कोठडी ट्रेन नं. 20482/81, यशवंतपूर/लखनऊ ट्रेन नं. 22483/84, मदुराई/चंडागढ़ ट्रेन नं. 122687/86, यशवंतपूर/निजामुद्दीन ट्रेन नं. 12649/50, तिरुवतंपूर/निजामुद्दीन ट्रेन नं. 12643/44, ऐर्नाकुलम/निजामुद्दीन ट्रेन नं. 12645/46, कन्याकुमारी/निजामुद्दीन ट्रेन नं. 12641/42 या रेल्वे गाड्यांचा थांबा देणे, त्याचप्रमाणे भांदक रेल्वे स्थानकावर मद्रास जम्मुतावी एक्सप्रेस ट्रेन नं. 16031/16032, मद्रास लखनौ एक्सप्रेस ट्रेन नं. 16093/16094, मद्रास जोधपूर एक्सप्रेस ट्रेन नं. 22663/22664, दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेस ट्रेन नं. 12791/12792, येरणाकुलम पटणा एक्सप्रेस  ट्रेन नं. 16359, नवजिवन एक्सप्रेस ट्रेन नं. 12656/12657, ग्रॅँड ट्रंक एक्सप्रेस ट्रेन नं. 12615/12616, हिसार एक्सप्रेस ट्रेन नं. 22737/22738 या रेल्वे गाड्यांचा थांबा देणे, माजरी रेल्वे स्थानकावर लखनऊ-चेन्नई एक्सप्रेस ट्रेन नं. 16093/94, कटरा-चेन्नई अंदमान एक्सप्रेस ट्रेन नं. 16031/32, नागपुर – मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ट्रेन नं. 11401/02 पूर्ववत थांब्यांसह सुरु करणे, वरोरा रेल्वे स्थानकावर मद्रास लखनऊ ट्रेन नं. 16093/16094अंदमान एक्सप्रेस ट्रेन नं. 16031/16032 या रेल्वे गाड्यांचा थांबा देणे, तसेच गाडी क्रमांक ०२२७४/०२२७३ जबलपूर-चांदा फोर्ट एक्स्प्रेस बल्लारपूरपर्यंत वाढविणे आणि सौंदडअंर्जुनीवडसानागभीड आणि मूल-मारोडा येथे थांबा देणे, इत्यादी मागण्या खा. बाळू धानोरकर यांनी केल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *