चंद्रपुर

चंद्रपूर महानगरपालिकेने सुरु केले ‘ रॅपिड अँटीजन टेस्टींग सेंटर ‘

चंद्रपूर (का.प्र.): मागील काही दिवसात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी,कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात तसेच या चाचण्यांचा निकाल लवकरात लवकर मिळण्याकरीता चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेद्वारे स्वत:चे पहिले कोविड १९ अँटीजन टेस्टींग सेंटर जटपुरा वॉर्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा येथे सुरु करण्यात आले आहे.
या लॅबमध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.