चंद्रपुर

चंद्रपूर जिल्हातील ४७ बाधित
कोरोना आजारातून झाले बरे

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २५ जून रोजी गुरुवारी आणखी दोन बाधित आढळले आहे. यासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधित संख्या ६४ झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डमधील २८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळला आहे. हैदराबाद येथून शहरात परतल्याची त्याची नोंद आहे. हा युवक १६ जून पासून संस्थात्मक अलगीकरणात होता.
       तर चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील २७ वर्षीय युवतीचा स्वॅब अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यवतमाळ येथून २१ जून रोजी परत आल्यानंतर ही युवती गृह अलगीकरणात होती. काल तिचा स्वॅब नमुना घेण्यात आला. आज अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
       चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) आणि २५ जून ( एकूण २ बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ६४ झाले आहेत. आतापर्यत ४७ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ६४ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता १७ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *