चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपुर जिल्हा पोलीस सलग पाचव्यांदा विजेते

चंद्रपुर :- नागपूर परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धा 2022 या दिनांक 18-09-2022 ते 23 09-2022 पर्यंत पोलीस मुख्यालय चंद्रपूर व सैनिक स्कूल, चंद्रपूर तसेच जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी पोलीस मुख्यालयात पार पडला. समारोप व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा.डॉ. छेरिंग दोरजे (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्रीय नागपूर पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. अरविंद साळवे, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. विजय मगर, वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. समारोपीय कार्यक्रमाचे परेड संचलन सपोनी, श्री जय निर्मल यांनी केले. चंद्रपूर, नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील पोलीस खेळाडूं परेड संचलनामध्ये सहभागी झाले. प्रमुख पाहुणे माननीय डॉ. छेरिंग दोरजे विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्रीय, नागपूर यांनी आपल्या भाषणात खेळाचे विशेष महत्त्व पटवून दिले. पोलीस खेळाडूंनी आपली शारीरिक जोपासना वेळात वेळ काढून कशी करावी याचे विशेष महत्त्व पटवून दिले. या स्पर्धांमध्ये पोलीस खात्यातील 660 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. सलग 5 वेळा नागपूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा जिंकण्याचा बहुमान चंद्रपूर पोलीस दलास मिळाला. उत्कृष्ट अॅथलेटिक्स पुरुष नाजूक मोहुर्ले (गडचिरोली जिल्हा) व उत्कृष्ट – अॅथलेटिक्स महिला सुनेना डोंगरे (वर्धा जिल्हा) यांनी मान पटकाविला. पुरुष खेळाडूंनी 201 पॉईंट व महिला खेळाडूंनी 153 पॉईंट प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवून जनरल चॅम्पियनशिप 2022 चंद्रपूर पोलीस दलाने मिळविली. चंद्रपूर पोलीस दलाची ही सलग पाचवी वेळ होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *