

चंद्रपूर : वेकोली माजरी क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या व न्यायिक मागण्यांच्या संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी कुचना विश्रामगृह येथे वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज दि. २१ एप्रिल २०२३ ला बैठक घेतली. प्रकल्पग्रस्तांना त्यांची जमीन ज्या प्रकल्पासाठी अधिग्रहित झाली, त्याच वेकोली क्षेत्रात अथवा लगतच्या क्षेत्रात नौकरी देण्यात यावी, सिंचित भूमीचा सातबारा वाटणी हिस्से झाले असेल तरी देखील सिंचित भूमिचेच दर द्यावे, सिंचन भूमीसाठी इलेक्ट्रिक बिलाचे अटीत शिथिलता द्यावी, सिंचन, कृषी च्या ३ वर्षाचे नोंदणीनुसार ओलीत धरावे, २०१२ पासून भूमीचे दर जैसेथे आहेत ते वाढवावे, पोलीस व्हेरिफेकेशन मध्ये गुन्हे दाखल असले तरी गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय नोकरीपासून वंचित करू नये. इत्यादी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी वेकोली प्रशासनाला केल्या आहेत. लवकरच वेकोली मुख्यालय नागपूर येथे बैठक आयोजित करू असे खासदार बाळू धानोरकर यांनी उपस्थितांना सांगितले.
या बैठकीस अनिल धानोरकर, वेकोली माजरी क्षेत्र महाप्रबंधक इम्तियाज, भोजराज झाडे, धनंजय गुंडांवार, नरेंद्र जीवतोडे, गुड्डू एकरे, पांडुरंग आगलावे तसेच वेकोलिचे अधिकारी उपस्थित होते.



