चंद्रपुर

गत 24 तासात सहा कोरोनामुक्त 14 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

 आतापर्यंत 22,849 जणांची कोरोनावर मात
 ॲक्टीव पॉझिटिव्ह 136
चंद्रपूर, दि. 22 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 14 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 382 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 849 झाली आहे. सध्या 136 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख नऊ हजार 637 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 84 हजार 644 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या घुटकाला वार्ड मधील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 397 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 359, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 14 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील सात, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर एक, भद्रावती एक, ब्रम्हपुरी एक व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *