
चंद्रपुर :- आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या उपस्थितीत आगामी गणेशोत्सव सणानिमित्त शक्तिप्रदर्शन रोड मार्च काढण्यात आला. मार्च बंगाली कॅम्प येथील शास्त्रीनगर पोलीस चौकी येथून सुरुवात करत सुभाष चंद्र बोस चौक ते नेहरूनगर फाटा नंतर परत बंगाली कॅम्प येथील अजय सरकारचे घराकडील रस्त्याकडून शिस्तबद्ध पद्धतीने परत आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस बांधवांची उपस्थिती व गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा वचक असावा तसेच उत्सव काळात परिसरात काही अनुचित घटना घडू नये या करिता पोलीस मार्च चे आयोजन करण्यात आले. रूट मार्च दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवार, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सह सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, संदीप धोबे, योगेंद्र यादव, योगेश हिवसे व पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट, मधुकर समलवार विनोद बुरले राजू बलगेवार, कमलेश देवगडे, रमेश दिवटे तसेच इतर अधिकारी व 56 पोलीस अमलदार, 36 सैनिक व एस आर पी एफ ग्रुपचे 1 अधिकारी व 8 अंमलदारासह रूट मार्च करण्यात आले.




