गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात आज एका मृत्यूसह 32 नवीन कोरोना बाधित*

* तर आज 40 कोरोनामुक्त तर
*गडचिरोली,(जिमाका)दि.04*: आज जिल्हयात 32 नवीन बाधित आढळून आले. तर आज 40 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8140 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7601 वर पोहचली. तसेच सद्या 454 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 85 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज नविन एका मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील अडपल्ली येथील 40 वर्षीय पुरुष कोविड निमोनियाने ग्रस्त होते. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.38 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.58 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.नवीन 32 बाधितांमध्ये गडचिरोली 14, अहेरी 4, आरमोरी 1, भामरागड 2, चामोर्शी 5, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 3, मुलचेरा 3, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.आज कोरोनामुक्त झालेल्या 40 रूग्णांमध्ये गडचिरोली 19, अहेरी 8, आरमोरी 2, भामरागड 1, चामोर्शी 6, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 2, कोरची 1, कुरखेडा 0 व वडसा मधील 1 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील आयटीआय चौक 2, गांधी वार्ड तलाव रोड 1, सर्वोदय वार्ड 1, रामपुरी वार्ड 2, स्थानिक 1, कारगिर चौक 1, विवेकनंदनगर 1, कलेक्टर कॉलनी 1, नंदनवननगर चामोर्शी रोड 1, नवेगाव कॉम्पलेक्स 1, विसापुर 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, इंदाराम 1, नंदीगाव 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये आवलगाव 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, लाहेरी आश्रम शाळा 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये अनखोंडा 1, आष्टी 1, भाडभिडी 2, विकासपल्ली 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये शिवनी 1,गुरनोरी 1, स्थानिक 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये श्रीनगर 1, स्थानिक 2, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *