चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आंब्रू नाईक माध्य आश्रमशाळा व संजय गांधी प्राथ आश्रम शाळा द्वारा नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा जाहीर सत्कार

जिवती :- आंब्रू नाईक माध्य आश्रमशाळा व संजय गांधी प्राथ आश्रम शाळा नगराळा द्वारा नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा शाळेतील कर्मचाऱ्याकडून शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्च प्रदान करून भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेतील शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी मुख्यध्यापक चुक्कलवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, सुधाकर अडबाले यांचा विजय हा संस्थेचा बहुमान वाढविणारा आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील समस्या निकाली लागेल, अशी अपेक्षा आहे. जुन्या पेंशन योजनेसाठी ते कर्मचाऱ्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील लढा तीव्र करू, या सत्कार सोहळ्यास संस्थेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुसपुरे यांनी तर आभार जाधव यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published.