राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज आणखी ४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५३७ वर पोहोचला आहे. नव्यानं आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील २८, ठाणे जिल्ह्यातील १५, पुण्यातील दोन, अमरावती व पिंपरी-चिंचवडमधील एकाचा समावेश आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना करता कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईचा पहिला क्रमांक आहे. मुंबईत […]
महाराष्ट्र
यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द
मुंबई (मवृसे)करोनामुळे ब्रिटनमधील परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून दुसèया महायुद्धानंतर प्रथमच विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा रद्द करण्याची वेळ संयोजकांवर ओढवली आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा तसेच ७ जूनपर्यंतच्या सर्व स्पर्धा रद्द झाल्यामुळे आता ऑल इंग्लंड क्लबकडे नैसर्गिक हिरवळीवर होणारी ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा रद्द करण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नव्हता. २८ जूनपासून ही स्पर्धा सुरू होणार […]
महाराष्ट्रात कोरोना बांधितांची संख्या ३३५
मुंबई (मवृसे)महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे. १४ रुग्ण मुंबईत तर १ रुग्ण बुलढाण्यात पॉझिटिव्ह आढळल्याने ३२० वरुन रुग्ण संख्या थेट ३३५ वर गेली आहे. करोनाशी लढा देता यावा म्हणून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अशात रुग्णसंख्या चांगलीच वाढते आहे […]
भाव वाढविणाऱ्यांवर कठोर कारवाईछगन भुजबळ
मुंबई (मवृसे)लॉकडाउनचा फायदा घेत भाववाढ करून ग्राहकांना लुटणाèयांवर तत्काळ कठोर कारवाईचे आदेश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा तसेच काळाबाजार व भाववाढ होणार नाही, अशी हमी राज्यकत्र्यांनी दिल्यानंतरही उपराजधानीतील अनेक घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी लॉकडाउनचा फायदा घेणे सुरूच […]
राज्यात २४ तासांत ७७ नवे कोरोनाग्रस्त;रूग्ण संख्या तीनशेपार
मुंबई (मवृसे) राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या २४ तासांत ७७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण आकडा ३०२वर पोहोचला आहे. एकट्या मुंबई आणि परिसरात ५९ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असून, मुंबईत गेल्या २४ तासांत ५९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात एकूण ७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे […]
वायफळ खर्च टाळा; काटकसरीची सवय लावून घ्या-शरद पवार
मुंबई (मवृसे)करोनाचं संकट हे आरोग्यविषयक आहे. मात्र, त्यातून बाहेर पडल्यानंतर आर्थिक संकट उंबरठ्यावर आहे. त्याला तोंड देण्याची तयारी आपण आत्तापासूनच करायला हवी. त्यासाठी काही सवयी बदलाव्या लागतील. व्यक्तिगत जीवनात काटकसर करण्याची सवय करून घ्यावी लागेल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेला दिला. करोनाच्या साथीमुळं निर्माण झालेल्या संकटाच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार […]
राज्यातील कोरोनाबाधित संख्या १५३ वर,आणखी २८ रूग्णांची नोंद
मुंबई (मवृसे) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज राज्यात आणखी २८ कोविड १९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सांगलीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा, तर नागपूरमधील बाधित आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४ जणांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येकी २ रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर, […]
सांगलीत कोरोनाचे १२ नवे रुग्ण; एकाच कुटुंबातील २३ बाधित
सांगली (मवृसे) सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २३ तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १४७ वर पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे इस्लामपुरात आढळलेले करोनाचे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. कुटुंबातील आधीच्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे सांगलीत कोरोना रुग्णांची संख्या […]
जीवनावश्यक वस्तू घरपोच-सोसायटीपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन व्हावे-अजित पवार
मुंबई (मवृसे)करोना विषाणू प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लॉकडाऊन च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात […]








