

चंद्रपूर : जनता कनिष्ठ महाविद्यालयातील नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी मुस्तफा लक्कडशा जूनियर याने जेईई मेन पेपर २ए (बी.आर्क) २०२३ परीक्षेत ४२ ची उत्कृष्ट अखिल भारतीय रँक (AIR) मिळवली आहे आणि ९९.९४ ची टक्केवारी मिळवून विदर्भात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुस्तफाने हे अतुलनीय यश केवळ त्याच्या अतुलनीय समर्पण, कठोर परिश्रम, चिकाटीच्या जोरावर आणि वेळोवेळी मिळालेल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाने तथा आई वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेने मिळविले आहे. सदर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुस्तफाचे संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य सौ. कविता रंगारी यांनी अभिनंदन केले आहे.



