![]()
मुल तालुक्यातील बहुसंख्य असलेल्या भेजगाव हे राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनसील असून स्थानिक स्वराज्य संस्थेत तालुका स्तरीय अनेक पदे भूषविलेले हे गावं आहे.मागील काही महिन्यांपूर्वी मुल तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व स्थानिक सरपंच अखिल गांगरेडीवर यांचे मालकीच्या दारूच्या दुकानातील चोरट्याने 21 पेट्या बियर तर एक देशी दारुची पेटी व पाच हजार रुपये रोख असे एकूण 85000 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. ही घटना सोमवार दिनांक १७ रोजी सकाळी घडली. देशी दारू दुकानाचे दिवाणजी अमोल अर्जुन शेंडे यांनी सकाळी सात वाजता देशी दारू दुकान उघडण्याकरिता गेले असता बाहेरचे सेटर जैसे थे असून आतील रुमच्या दरवाजाला कुलूपच नसल्याने इतरत्र पाहणी केली असता मागच्या खिडकीचे ग्रील कटरने कापून आत प्रवेश केला. आणि आतील सामान असता व्यस्त दिसल्याने लगेच त्यांनी ही घटना मालक अखिल गांगरेड्डिवार यांना कळविली. मालक यांनी स्वतः चौकशी करून देशी दारू दुकानाचे मालक अखिल विलास गांगरेडीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुल पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती होताच मुल उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी आपल्या ताफ्यासह भेजगावं येथे घटनास्थळी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी चंद्रपूर वरून ठसा तंत्रज्ञ व डॉग च्या साह्याने तपास केला गेला. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी आपल्या सहकार्यासह तपास करत करीत आहेत.




