चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपूर शहर स्वच्छ करण्यात सामाजिक संघटनांनी घेतलेला पूढाकार कौतुकास्पद – आ. किशोर जोरगेवार

महानगर पालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत योग नृत्य परिवाराचा सहभागआमदार किशोर जोरगेवार यांनी दिली उपक्रमाला भेट.

महानगर पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जात असलेल्या संयुक्त स्वच्छता अभियानात विविध सामाजिक संघटनांनी पूढाकार घेत शहर स्वच्छ व सुंदर करण्याची मोहिम हाती घेतली आहे. योग नृत्य परिवारानेही यात घेतलेला सक्रिय सहभाग महानगर पालिकेच्या या अभियानाला हातभार लावणारा असुन आपले शहर स्वच्छ करण्यासाठी सामाजिक संघटनांनी घेतलेला पूढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ‘‘ स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ‘‘ आयोजित केली गेली यात योग नृत्य परिवारानेही सहभाग घेतला असून त्यांच्या वतीने चंद्रपूर शहरातील प्राचिन गोविंद स्वामी मंदिराची स्वच्छता केल्या जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे भेट दिली असुन माहिती जाणून घेतली. या प्रसंगी ते बोलता होते. यावेळी माजी नगरसेवक बलराम डोडाणीयंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ताअजय जैस्वालश्याम हेडाऊदेवानंद साखरकर, योग नृत्य परिवाराचे संस्थापक गोपालजी मुंदडागोविंद स्वामी मंदिर कार्यकारणी अध्यक्षकिरण अंदनकरसुबोध दुर्गपुरोहितमुग्धा खांडेप्रकाश कवीश्वरचंद्रशेखर मुनगंटीवारधनंजय तावाडेमीना निखारेहरिदास नागापूरेराधिका मुंदडाअलका गुप्तामंगेश खोब्रागडेआदिंची उपस्थिती होती.

 यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले किचंद्रपूरातील कोणत्याही सामाजिक उपक्रमात चंद्रपूकरांचा नेहमी उत्स्फृत प्रतिसाद मिळतो. माता महाकाली महोत्सव समीतीच्या वतीने आपण शहरातील सर्व माता माराई मंदिरांचा सव्र्हे करणार असून येथे स्वच्छता मोहिम राबवून विकास कामे करणार आहोत. यातही सामाजिक संघटनांची मदत आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर शहाराला मोठा प्राचिन वारसा लाभला आहे. मात्र यातील अनेक मंदिर अपेक्षीत आहे. अशा मंदिरांचाही आपण सव्र्हे करणार असुन या मंदिरांना गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ‘‘ स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत योग नृत्य परिवाराचा सहभाग सामाजिक बांधीलकी जपनारा आहे. त्यांच्या वतीने 400 वर्षा पुर्वीचे गोविंद स्वामींचे पूरातन मंदिर स्वच्छ करण्याची मोहिम योग नृत्य परिवाराने घेतली आहे. त्यांच्या वतीने येथे उत्तम काम केल्या जात आहे. इतकेच नव्हे तर 12 पथके तयार करुन त्यांनी शहरातील विविध भागात स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. त्यांचे हे कार्य चंद्रपूरातील सुदंरतेच भर घालणारे असुन समाजहिताचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. सदर स्वच्छता मोहिमे अंतर्गत योग नृत्य परिवाराच्या वतीने परिसरातील झाडी झुडपी काडण्यात येत असुन भिंतीची रंगरंगोटी केल्या जात आहे. यात योग नृत्य परिवारातील शेकडो सदस्यांनी सहभाग घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.