चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

दिव्यांगांनी घेतला मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग

दिव्यांग कौशल्य विकास संस्थेचे आयोजन

चंद्रपूर:- भारतीय संविधानाने समाजातील सर्व समाज घटकांना लोकशाही मजबूत करण्याच्या प्रक्रियेत मतदानाच्या माध्यमातून सहभागी करून घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून भारत निर्वाचन आयोग यांच्या निर्देशानुसार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर व दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपरपज सोसायटी, चंद्रपूर तथा राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विदर्भ विभाग नागपूर/ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम चे आयोजन स्थानिक पठाणपुरा गेट जवडील दिव्यांग कार्यालयात केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चंद्रपूर तहसील कार्यातीलचे नायब तहसीलदार डॉ. जितेंद्र गादेवार होते. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांना सांगितले कि भारत निर्वाचन आयोगने दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेता यावे म्हणून मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींच्या गरजे नुसार सुधार करण्यात येत आहे. जसे राम्प,  व्हीलचेअर ची सुविधा, ब्रेनलीपी मध्ये सूचना पत्र, यादी सुविधा तेव्हा सर्व १८ वर्षावरील दिव्यांग व्यक्तींनी मतदान यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे असे आव्हान पण केले. विचार मंचावरती चंद्रपूर तहसील कार्यातील निवडून समन्वयक अमर श्रीरामे, दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपरपज सोसायटी, चंद्रपूर चे अध्यक्ष निलेश पाझारे, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विदर्भ विभाग नागपूर/ चंद्रपूर चे सचिव भारत पचारे, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सचिन हेडाऊ यांची उपस्थिती होती. यांनी सुद्धा दिव्यांग व्यक्तींना मतदानाचे महत्व सांगितले आणि मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभ नोंदवावे असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कल्पना शिंदे यांची केले तर आभार प्रदर्शन दर्शना चाफलेनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना ब्राह्मणे, भाग्यश्री कोलतेकैलास ब्राह्मणेरवींद्र उपरेराजेश चव्हाणशाबीर शेखदीपक मुटेकर, जयकुमार पवार तसेच दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपरपज सोसायटी आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.