चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

कोलगाव कोळसा खाण परिसरात दिवसाढवळ्या नागरिकांना वाघाचे दर्शन

चंद्रपुर :- कोलगाव खुल्या कोळसा खाण परिसरात दिवसाढवळ्या कामगार व नागरिकांना वाघाचे दर्शन झाल्यानं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  कोलगाव कोळसा खाण परिसरात वेकोलीचे ओव्हर बर्डन असून ठिकठिकाणी झाडेझुडपे वाढले आहेत. त्यामुळं या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर सुद्धा नेहमी बघायला मिळतो. अशातच कोलगाव मार्गावर काही वेकोली कामगारांना दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन झाले. या वाघाचे चित्रीकरण येथील कामगारांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे. दरम्यान वाघाचे दर्शन झाल्यानं वेकोली कामगार व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळं या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.