![]()
1 ऑक्टोबरपासून चंद्रपूरात एतिहासीक महाकाली महोत्सवाला सुरवात झाली आहे. काल रविवारी सांयकाळी पाच वाजता महाकाली मंदिरातुन महाकाली मातेची भव्य नगर प्रदक्षिणा पालखी निघाली हर हर शंभु गाण्याची सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पांडा यांच्यासह अनेक आकर्षण या पालखीत होते .
महाकाली मातेची भव्य नगर प्रदक्षिणा पालखीसाठी माता महाकाली सेवा समीतीच्या वतीने भव्य नियोजन करण्यात आले . सदर पालखीत हर हर शंभु गाण्याची सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पांडा यांचा रोड शो आकर्षक होता. सोबतच 13 अश्व, अश्व आरुढ नवदुर्गांचे बोलके दृष्य, अश्व आरुढ राणी हिराईचे बोलके दृष्य, श्री. माता महाकालीची चांदीची मूर्ती व पादुका, पालखीत अब्दागीरी व तूतारी, पोतराजे नृत्य, प्रधानमंत्री आणि उपराष्ट्रपती यांच्या कार्यक्रमात वादन करणारे राज्यातील प्रथम क्रमांकाचे 111 कलाकारांचे शिवगर्जना ढोल ताशा व ध्वज पथक, अश्वावर देवी देवतांचे साकारलेले बोलके दृष्य, नागपूर, चंद्रपूर, राजुरा येथील तिन ढोल ताशा पथक, दोन बॅंड पथक, गायत्री परिवाराचा 100 महिलांचा कळस समुह, 100 शंखनाथ महिलांचा समुह, १५० लोकांचे पाच लेझीम पथक, 100 महिलांचे ध्वजधारी पथक, 3 ध्वनी वादक पथक, पवनसुत प्रभु श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृष्य, पुरुष / महिला दांडीया समुह, योग्य नृत्य परिवारातील १००१ पुरुष / महिलांचे योग नृत्य, 4 आदिवासी नृत्य, 1 लैंगी बंजारा समाज नृत्य, 100 मुला / मुलींचे कराटे प्रात्याक्षिक दृष्य, 80 वादकांसह जगदंब ढोल पथक, शिवाज्ञा वाद्य पथक यांच्यासह इतर धार्मीक सांस्कृतीक आणि सामाजिक देखावे आकर्षित करीत होते प्रसिध्द हर हर शंभू गाण्याची सुप्रसिध्द गायिका अभिलिप्सा पांडा व सुप्रसिध्द जागरणकार अजित मिनोचा महाकाली महोत्सवाकरिता चंद्रपूरात आले आहेत. 1 ऑक्टोंबर पासुन चंद्रपूरातील महाकाली मंदिर पटागंणात आयोजित माता महाकाली महोत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. 4 ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या या महाकाली महोत्सवाला महाकाली भक्तांचा मोठा सहभाग लाभत आहे. 1 ऑक्टोंबरला शनीवारी सायंकाळी जबलपूर मध्यप्रदेश मधील सुप्रसिध्द देवी गीत जागरणकार अजित मिनोचा यांचा जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या सोबत ईशांत मिनोचा हे ही देवी गीतांचे सादरीकरण करणार आहे. तर 2 ऑक्टोंबरला आयोजित श्री. माता महाकाली नगर प्रदक्षिणेत समाज माध्यमांवर धमाल माजवत असलेल्या हर हर शंभू या गाण्याची ओडीसा येथील गायिका अभिलिप्सा पांडा आपल्या संचासह रोडशो मध्ये सहभागी होणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला महाकाली भक्तांसह चंद्रपूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.




