चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

बल्लारपूर तालुक्यात ” मिशन जय किसान ” चित्र रथाचा शुभारंभ

बल्लारपूर  : तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी मंत्री वने,सांस्कृतिक कार्य आणि मस्त्य व्यवसाय,तथा जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या संकल्पनेतून : मिशन जय किसान ” या चित्र रथाचा शुभारंभ बल्लारपूर कृषी कार्यालयातून करण्यात आला.
          याप्रसंगी आत्मा प्रकल्प चंद्रपूरच्या संचालक प्रीती हिरळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रथाची रवानगी ग्रामीण भागात प्रचारासाठी करण्यात आली.यावेळी उपविभागणीय कृषी अधिकारी एन.एन.घोडमारे ,तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण,मंडळ कृषी अधिकारी बी.एस.सलामे,सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण धानोरकर,यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमा अंतर्गत प्रीती हिरळकर व एन.एन.घोडमारे यांनी कृषी कार्यालयात १०००० एफपीओ व इतर विषयावर आढावा बैठकाघेऊन मार्गदर्शनकेले.
         चित्र रथाचे तालुक्यातील मौजा किन्ही येथे सरपंच  संगीता सत्रे,तसेच मायाताई सत्रे,शेतकरी वासुदेव येरगुडे,अजय तोटावार कृषी पर्यवेक्षक एस.ए.बोबाटे,कृषी सहायक बालाजी पवार व गावकऱ्यांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी बालाजी पवार यांनी मिशन जय किसान चा उद्देश समजावून सांगितला

Leave a Reply

Your email address will not be published.