चंद्रपुर :- सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथे अंधाराचा फायदा घेत बुधवार च्या रात्रो अज्ञात इसमाने घरात घुसुन ६० वर्षीय वृद्धाला कुराड़ीने वार करुन ठार केले. सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथील ईश्वर कवडू परचाके (६०) हे नेहमीप्रमाने जेवन करुन रात्रो झोपले होते. त्याच दरम्यान बुधवार च्या रात्रो अंदाजे ११.३० वाजताच्या दरम्यान काही अज्ञात इसमांनी परचाके यांच्या घरात घुसुन धारदार कुराडीने वार करुन त्यांची हत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस घटनास्थळ गाठुन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रूग्णालय सिंदेवाही येथे पाठविण्यात आले आहे. दोन आरोपींना अटक केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून आरोपीची नावे व हत्येचे कारण कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मूल मल्लिकाअर्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिस स्टेशन चे ठाणेदार योगेश घारे करीत आहे.