चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

एकजुटीने कामाला लागा… तर विजय निश्चित – आ. विजय वडेट्टीवार

ब्रम्हपुरी येथे पदाधिकारी, व कार्यकर्ता बैठकीत आवाहन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून विकासात्मक दृष्टिकोनातून ब्रह्मपुरी मतदार संघात सर्वाधिक निधी आणून प्रचंड प्रमाणात विकास कामे पार पडली.अलीकडल्या काळात सत्ता परिवर्तनानंतर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रकार सध्याच्या सरकारकडून सुरू आहे. अशा थापाड्यांचे विचार जनसामान्यांना भ्रमित करू नये याकरिता काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चितच विजयश्री मिळेल याकरिता सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. ते ब्रम्हपुरी येथे विश्रामगृहात पार पडलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.

याप्रसंगी आयोजित बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सदस्य डॉ राजेश कांबळे, स्मिता पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, नगराध्यक्षा रिता उराडे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, नगरसेविका सुनीता तिडके, लता ठाकुर, वनिता अलगदेवे, निलीमा सावरकर, माजी सभापती नेताजी मेश्राम, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, न.प.माजी उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सुरेश दर्वे, दिवाकर मातेरे, सरपंच उमेश धोटे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले, वकार खान, माजी सरपंच संदीप सेलोकर, उपसरपंच गुरुदेव वाघरे, सुधाताई राऊत, किशोर राऊत, सोमेश्वर उपासे, प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की,
पक्षाचा कार्यकर्ता हा ग्रामीण असो की शहरी भागातील असो तो पक्षाचा ” कणा’ म्हणून काम करीत असतो. काँग्रेस पक्षाने स्थापनेपासूनच संपूर्ण देशात विकासाची क्रांती घडवली. याच दरम्यान काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी जनसेवेसाठी बलिदानही दिले. हे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आज घडीला राज्यात जे धर्मांधांकडून जातीपातीच्या नावावर अराजकता पसरविल्या जात आहे त्याचा बिमोड करण्यासाठी संघटनात्मक बांधणी तून पक्षाचे विचार घरोघरी व तळागाळा पर्यंत पोहोचविणे काळाची गरज असून पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष संघटनावर जोर देणे गरजेचे आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित विजयश्री खेचून आणण्यासाठी आजच प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्याने कंबर कसून प्रयत्नशील परकाष्टा करावी असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शनातून केले. तसेच मतदार संघातील प्रत्येक गावात भेटीगाठीतून पक्ष संघ नात्मक बांधणीवर अधिकाधिक जोर दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना दिली. याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेसचे अनुसूचित जाती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.