चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अखेर आज त्या पाचही मृतदेहांचे एकाच चितेवर अंतिम संस्कार

दोन दिवसांपूर्वी रात्री 11 च्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील मुल जवळील अजयपुर येथे लाकडांनी भरलेला ट्रक व डिझेल टँकर मधे जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने आगीच्या भक्षस्थानी पडले होते. हा अपघात इतका भिषण होता की 9 लोकांचा जागीच जळून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तरीही डिझेल टँकर सकाळपर्यंत जळतच होता.

ह्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची ओळख पटविणे सुद्धा अशक्य होऊन बसले होते. मात्र ह्या 9 मृतकांपैकी प्रशांत नगराळे, साईनाथ कोडापे, मंगेश टिपले, महिपाल मडचापे, संदीप आत्राम, बाळकृष्ण तेलंग हे 6 लोक बल्लारपूर तालुक्यातील दहेली ह्या एकाच गावातील असल्याने दहेली येथे अक्षरशः हाहाकार माजला होता. प्रशासनाने प्रयत्नपूर्वक सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करून शव नातेवाईकांना सुपूर्त केले मात्र संदीप आत्राम वगळता प्रशांत नगराळे, साईनाथ कोडापे, मंगेश टिपले, महिपाल मडचापे, बाळकृष्ण तेलंग ह्या पाचही मृतदेहांची ओळख पटविणे अशक्य असल्याने अखेर सर्वांचे मृतदेह गाठोड्यात बांधुन कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आले होते. अखेर आज त्या पाचही मृतदेहांचे एकाच चितेवर अंतिम संस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *