
चंद्रपूर : जिल्हाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही उभ्या आहेत. जिल्हाचा इतिहासात आज अधिक भर पडली. जिल्ह्यातील भेजगाव येथिल मामा तलावाचा खोलीकरणाचा कामा दरम्यान अकराव्या शतकातील यादवकालीन शिल्प आढळले आहे. या तलावाचा पाळीवर जिर्ण मात्र देखणे हेमाडपंथीय मंदीर आहे. या शिल्पात एका रेड्यावर अथवा मेंढ्यावर गदाधारी पुरूष मांडी घालून बसलेला दिसतो. त्याचा डाव्या हातात गदा आहे. शिल्प जिर्ण झाले आहे. त्यामुळे हे शिल्प नेमके कुणाचे हे सांगणे जरा कठीण असल्याचे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले. अकरा, बाराव्या शतकात चंद्रपूरचा काही भाग यादवांचा सत्तेखाली होता. सत्ताकाळात यादवांनी अनेक हेमाडपंथीय मंदीरांची निर्मिती केली होती.




