
चंद्रपूर (का.प्र.) कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पाश्र्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे १५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मिलन चौक येथुन डीप क्लीनिंग मोहीम सुरु करण्यात आली. मिलन चौक ते जटपुरा गेट व धांडे हॉस्पीटल ते क्राईस्ट हॉस्पीटल या शहराच्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर साफसफाई करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. डीप क्लीनिंग मोहीमे अंतर्गत पहील्यांदा परिसर झाडुन स्वच्छ केल्या गेला, जमा झालेला कचरा तात्काळ उचलल्या जाऊन निर्जँतुकीकरण करण्यासाठी रस्त्यावर व परिसरातील दुकानांवर फवारणी करण्यात आली तसेच मार्गातील एटीएम केंद्राचीही पूर्णतः स्वच्छता करण्यात आली त्यानंतर ब्लिचिंग पावडर टाकून परीसर पुर्णपणे स्वच्छ व निर्जंतुक राहील याची काळजी घेण्यात येऊन डीप क्लीनिंग मोहीम राबविण्यात आली. यापुढे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर ही मोहीम राबविली जाणार आहे. सद्यस्थितीत चंद्रपूर शहरात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. मात्र राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे युद्ध स्तरावर सफाई मोहीम राबविली जात आहे.



