विदर्भ

नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा ६ ने वाढला

नागपूर (मवृसे)नागपूर शहरात सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामूळे मृत्यू झालेल्या सतरंजीपुरा येथिल व्यक्तीचे नातेवाईक आणि संपर्कातील हे ६ जण आहेत. या सहा कोरोना पॉझिटिव्ह रुगांचे वय अनुक्रमे ८, १२, २१, ३०, ३४, ३५, आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे नागपुरात (सामाजिक संसर्ग) चा धोका वाढत आहे. नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या २५ झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात आहेत.

नागपूरचा सतरंजीपुरा/ मटकासाथ सील

सतरंजीपुरा येथिल व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील ६ लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. त्यानंतर पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. आणि त्या ६ लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी आरोगी विभाग करत आहे. विदर्भात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ७२ झाली आहे. यात नागपूर २५(एक मृत्यू), बुलडाणा १७(एक मृत्यू), यवतमाळ ११, अकोला १३, अमरावती ४(एक मृत्यू), गोंदिया १, वाशीम १ चा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *