
चंद्रपूर (का.प्र.) सध्या संपूर्ण देशात कोरोना (कोविड-१९) विषाणूच्या प्रादुर्भाव सुरु आहे. त्यामुळे रक्तदात्यांची संख्येत कमी होत चालली आहे. हि बाब लक्षात घेता. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार, बल्लापूर तथा माजी वित्त नियोजन व वन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी रक्तदान करण्यास जनतेला आवाहन केले होते. त्याअनुषंगाने रामनवमीच्या पवित्र पर्वात दिनांक २ एप्रिल, २०२० रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय, चंद्रपूर व आय.एम.ए. यांच्या सहकार्याने रक्तदानाची सुरुवात करण्यात आली. रक्तदान श्रेष्ठदान आहे त्याअनुषंगाने आज दिनांक १० एप्रिल २०२० रोजी सकाळी ९ वाजता राखी संजय कंचर्लावार, महापौर, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी आपल्या परिवारासह रक्तदान केले.
महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या कि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात सुरु असल्यामुळे रक्तदात्यांच्या मनात भीतीचे वातावरण सुरु आहे. त्यामुळे रक्तदान करणाèयांची संख्या कमी होत आहे. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये या करीता सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार, बल्लापूर तथा माजी वित्त नियोजन व वन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी रक्तदान उपक्रमाची सुरुवात केली. संपूर्ण देशावर कोरोना हे संकट आलेले आहे. या संकटावर मात करण्यासाठी माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा हा उपक्रम अतिशय सुंदर उपक्रम आहे. याबद्दल भाऊंचे अभिनंदन व आभार मानले. शहरात सिकलसेन व इतर रुग्णांना रक्ताची खूप आवश्यकता असते अश्या वेळेत रक्तदान करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून आपण रक्तदानाच्या मार्फत त्यांचे जीव वाचविण्यास मदत करू शकतो.
रक्त हे कोणत्याही प्रयोगशाळेत तयार होत नाही. रक्त फक्त माणसाने माणसाला देऊ शकतो, माणुसकीचा उपक्रम हा सर्वात श्रेष्ठ रक्तदान हा उपक्रम भाऊंनी सुरू केला आहे. लॉक डाऊन च्या नंतर जिल्हा शासकीय रुग्णालय, चंद्रपूर व आय.एम.ए. यांच्या सहकार्याने दररोज कमीत कमी ५ रक्तदाते रक्तदान करीत आहे व आतापर्यन्त ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केला आहे. या बद्दल महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी सर्वांचे अभिनंदन करून धन्यवाद केले. तरी या उपक्रमाला अशीच भरपूर साथ द्यावी व कोरोना या संकटाला मात करू हा माझा विश्वास आहे. चंद्ररपूकरांनी रक्तदान करावे असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. या प्रसंगी डॉ. मंगेश गुलवाडे, दत्ता महादाणी, प्रशांत विघ्नेश्वर, नगरसेवक रवी आसवानी, सुभाष कसनगोट्टूवार, डॉ. झेबा निसार व जिल्हा शासकीय रुग्णालय, चंद्रपूर व आय.एम.ए.ची पूर्ण टीम उपस्थित होते.



